Work in India

Association For India's Development - Projects Database
India
 
 
One for India
Bai Mi Dharana

Lyrics by Daya Pawar  | Listen
धरण
दया पवार

बाई मी धरण धरण धरण बांधते
माझं मरण मरण मरण कांदते    

झुंजू मुंजू ग झालं पीठ जात्यात आटल
कणी कोंडा ग कोंडा ग कोंडा ग रांधीते

दिस कासऱ्याला आला जीव माग घोटाळला
तान्हं लेकरू लेकरू लेकरू पाटीखाली घालते

काय सांगू उन्हाच्या झळा घाव खाली फुटे शिळा
कढ दाटे कढ दाटे पायी पाला मी बांधिते

पेरा पेरात साखर त्याचं पिकलं शिवार
घोटभर पाण्यासाठी सारं रान धुंडळाते

येल मांडवाला चढे माझ्या घामाचे ग अढे
माझ्या अंगणी अंगणी अंगणी पाचोळा ग पडे

 

for more lyrics of movement songs, visit:

 
Next >